About Navhind Credit Society
About Navhind Co-Op. Credit Society Yellur
नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर
नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर या संघटनेची स्ठापना युवानेते कै. वाय. बी. चौगुले सर यांनी इ.न. 1985 साली आंतरराष्ट्रीय युवक वर्षाचे औचिक साधून केली. नवहिंद क्रीडा केंद्राने मराठी मॉडेल स्कूलचा शाळेतील फळे दुरुस्तीकरुन युवकांच्या विधायक व शैक्षणिक कार्याची मुहुतमेढ रोवली.
त्यानंतर नवहिंदने बौध्दीक स्पर्धा, शारिरिक स्पर्धा, खो–खो-, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नवहिंदने वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, मोफत नेत्र शस्त्रक्रीया शिबीर अशी विविध कार्ये केलेली आहे्त.
त्याचबरोबर अनेल गरजू व पिडीत व्यक्तिंना नवहिंदच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून दिली. किल्लारी लातूर येथील भूंकप निधी, कोरोना काळात कर्नाटक व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्य निधीला भरघोस मदत देवून सामाजिक बांधीलकी जपली आहे.
येळ्ळूर जल निर्मल योजनेला भरीव मदत
सन २००२ साली येळ्ळूर गावाच्या जलनिर्मल योजनेसाठी संस्थेने दहा लाख रुपयाचे अर्थ सहाय्य केले. गावातील रस्ते , गटारी, पिण्याच्या पाण्याची सुविधा देणारी सुमारे २ कोटीची निर्मल योजना कार्यन्वीत केली आहे.
नवहिंद बचत योजना
क्रीडा व सामाजिक कार्य सुरु असताना आर्थिक नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सन 1988 साली बचत योजना सुरु केली. व त्यातून गरजूना कर्ज वितरण करण्यात आले. या पंच वार्षिक बचत योजनेचे पूर्ण भांडवल नवहिंद को– ऑप. क्रेडीट सोसायटीत वर्ग / परिवर्तन करण्यात आले. आणि सोसायटीची गुढीपाडवानिमित्त सन 1992 साली स्थापना करण्यात आली.
सक्षम नेतृत्व आणि निष्ठावान कार्यकर्ते यांच्या संयोगाने युवकांचे मन व मनगट मजबूत करणारी एक सहकार संस्था म्हणून नवहिंदचा उल्लेख होतो. अथक परिश्रमातून सोसायटीनी रु. 400 कोटीची उलाढाल करुन सहकार क्षेत्राच्या क्षितिजावर आपले अस्तित्व निर्माण केले आहे.
नवहिंद बक्षिस योजना
आरंभीच्या काळात नवहिंद बक्षिस योजना सुरु करुन दर्जेदार मंगल मिक्सर गृहिणींना उपलब्ध करुन देण्यात आले.
नवहिंद ग्राहक सेवा केंद्र सन 1990
ग्राहकांना जिवनोपयोगी वस्तू सुलभ हप्त्याने देण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर गरजू कामागारांना सुमारे 1800 पेक्षा अधिक सायकली सुलभ हप्त्याने दिल्या. त्याल उदंड प्रतिसाद लाभला.
अशा प्रकारे तळागाळात प्रत्यक्ष कार्य करुन “नवहिंद परिवार” ने सहकार क्षेत्रात पदार्पण केले आहे.
संस्थेला मिळालेले पुरस्कार
नवहिंद सोसायटीला सन 2004 साली कर्नाटक सरकारच्या सहकार खात्याचा “सर्वेकृष्ट सोसायटी” हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याच बरोबर नवी दिल्ली येथील एकॉनॉमिक ग्रोथ सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने “राष्टीय विकास रत्न पुरस्कार” बहाल करुन करुन नवहिंद सोसायटीचा गौरव केलेला आहे.
The Navhind Co operative Credit Society Ltd Yellur (Multi State) Belgaum
Board of Directors 2023-28
Mr. Prakash P. Ashtekar
CHAIRMAN
Mr. Anil H. Hundre
VICE-CHAIRMAN
Mr. Pradeep S. Murkute
Director
Mr. C. B. Patil
Director
Mr. Uday S. Jadhav
Director
Mr. Shivaji Saynekar
Director
Mr. Sambhaji K. Kanbarkar
Director
Mr. Shidhar Dhamanekar
Director
Smt. Snehlata Y. Chougule
Director
Mrs. Neeta N. Jadhav
Director
Mr. B. R. Punnannavar
Director
Mr. N. D. Vernekar
Asst. General Manager